जळगाव मिरर | २९ जुलै २०२५
विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव येथे आयोजित सीबीएसई क्लस्टर 9 कबड्डी स्पर्धा 2025-26 चा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा व दीव-दमण येथील एकूण ३६ सीबीएसई शाळांमधील ५९ संघांनी सहभाग घेतला होता . एकूण ६७५ खेळाडूंनी विविध गटांमध्ये आपले सर्वोत्तम कौशल्य सादर करत उत्कृष्ट कामगिरी बजावली.
या भव्य स्पर्धेच्या दरम्यान केंद्रीय राज्य क्रीडामंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे व मा. खासदार सौ. स्मिताताई वाघ,तसेच मा.आमदार श्री राजूमामा भोळे यांनी विशेष उपस्थिती दर्शवत स्पर्धास्थळी भेट दिली आणि सर्व सहभागी खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्र नाईक,कमांडिंग ऑफिसर 18 महाराष्ट्र बटालियनचे श्री अश्विन वैद्य आणि एस एम सुरेश कुमार, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजेंद्र नन्नवरे उपाध्यक्षा व शालेय समिती प्रमुख सौ हेमा ताई अमळकर सचिव श्री विनोद पाटील, सहसचिव श्री दिलीप महाजन, पंचप्रमुख श्री सुनील राणे, सी.बी.एस.ई निरीक्षक श्री परवेज शेख तसेच व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव श्री विनोद पाटील यांनी केले तर, अध्यक्षीय भाषणामध्ये श्री राजेंद्र नन्नवरे यांनी खेळाचे खेळाडूंच्या जीवनातील महत्व आणि कौशल्ये याविषयी खेळाडूंना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे श्री अश्विन वैद्य यांनी आपल्या भाषणात कोणत्याही गोष्टीच्या ध्येयप्राप्ती पर्यंत ती गोष्ट सोडू नका आणि तिला सकारात्मकतेने घ्या असा विद्यार्थ्यांना संदेश दिला. शाळेचे प्राचार्य श्री प्रवीण सोनवणे सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
14 वर्षा आतील मुली
प्रथम आर्यन वर्ल्ड स्कूल पुणे
द्वितीय पा योनियर पब्लिक स्कूल पुणे
तृतीय सेंट जोसेफ स्कूल बुलढाणा
चतुर्थ केपीसी पब्लिक स्कूल रायगड
14 वर्षा आतील मुले
प्रथम डॉक्टर सायरस पूनावाला पुणे
द्वितीय आर्मी पब्लिक स्कूल पुणे
तृतीय पिके इंटरनॅशनल स्कूल पुणे
चतुर्थ ज्ञानवर्धिनी पुणे
17 वर्षा आतील मुली
प्रथम सरहद स्कूल कात्रज पुणे
द्वितीय श्री श्री रविशंकर स्कूल लातूर
तृतीय द्वारका स्कूल पुणे
चतुर्थ सिग्नेट स्कूल पुणे
सतरा वर्षा आतील मुले
प्रथम सिग्नेट पब्लिक स्कूल पुणे
द्वितीय आर्मी पब्लिक स्कूल पुणे
तृतीय सिंहगड पब्लिक स्कूल पंढरपूर
चतुर्थ सहकार विद्या मंदिर बुलढाणा
19 वर्षा आतील मुली
प्रथम विद्या प्रतिष्ठान इंग्लिश स्कूल बारामती
19 वर्षा आतील मुले
प्रथम आत्मा मलिक स्कूल कोपरगाव
द्वितीय संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर
या मध्ये प्रशासकीय अधिकारी श्री दिनेश ठाकरे, वाहन विभाग प्रमुख श्री मिलिंद पुराणिक , यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
