
जळगाव मिरर । ६ जानेवारी २०२३
शहरातील एका शाळेत शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात इसमाने पळून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना घडल्यानंतर चाळीसगाव शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मैत्रिणी दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास शाळेत जात असताना अज्ञात इसमाने त्यांना काहीतरी फुस लावून पळून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या भावाने चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात फिर्याद देत अज्ञात ईसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी सागर ढिकले हे करीत आहे.




















