जळगाव मिरर । १७ डिसेंबर २०२५
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकीत्सक डॉ. किरण पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी धुळे येथील स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. स्वप्निल विजयराव सांगळे यांना पदोन्नती देवून बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाचे क उप-सचिव दीपक केंद्रे यांनी मंगळवार दि. १६ रोजी सायंकाळी काढले.
गेल्या पाच वर्षांपासून डॉ. किरण पाटील हे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक पदावर कार्यरत होते. कोरोना काळात जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्तीनंतर त्यांना जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात मोहाडी येथील स्त्री रुग्णालय सुरु झाले असून नवजात शिशू अतिदक्षता विभागात अमुलाग्र बदल झाले आहे. तसेच मनुष्यबळ भरती संदर्भात महत्वाचे निर्णयांसाठी त्यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. दरम्यान, डॉ. पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी धुळे येथील स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. स्वप्निल सांगळे यांना पदोन्नती देत बदली करण्यात आली आहे. धुळे येथे काम करतांना त्यांनी अनेक चांगले शासन निर्णय घेतले असून तेथील अनुभवाचा फायदा जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून वैद्यकीय काम करतांना निश्चित होणार आहे.




















