जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना धक्कादायक घटना मुंबई शहरात घडली आहे. लग्नास नकार देणाऱ्या एका शिक्षिकेला लोखंडी सळईने मारहाण केल्याची संतापजनक घटना मुंबईच्या मालाड परिसरात घडली आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेत पीडितेच्या डोक्याला, डाव्या हाताला व कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, चमन उर्फ मोहम्मद हाऊन इद्रीस असे आरोपीचे नाव आहे. पीडिता शिक्षिका असून, ती मालाड पूर्व परिसरात राहते. आरोपीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. या प्रेमापोटी त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. पण पीडितेने नकार दिल्याने त्याने तिला लोखंडी सळईने मारहाण केली.