जळगाव मिरर | ४ फेब्रुवारी २०२४
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून उत्तम प्रशासक म्हणून आदर्श निर्माण केला. शिवाजी महाराज हे जलयुक्त शिवाराचे प्रणेते होते. माझ्या ग्रामीण भागातील ममुराबाद येथे महाराजांचा पुतळा उभारल्याचा सार्थ अभिमान असून त्यांनी केलेले कार्य प्रत्येकाच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवरायांचा पुतळा (स्मारक) म्हणजे हिंदुस्थानचे प्रेरणेचा स्रोत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते ममुराबाद येथे शिवरायांच्या पुतळा अनावरण प्रसंगी बोलत होते.
जळगाव तालुक्याच्या वैभवात भर घालणारा आणि जळगाव ग्रामीणमध्ये सर्वाधिक उंच असलेल्या ममुराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष दादा पाटील, आ.राजूमामा भोळे व सर्वच मान्यवरांनी पुतळाकृती समितीचे कौतुक करून अभिनंदन केले.
यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले की, छत्रपतींचे आचार व विचार आत्मसात करण्याची काळाची गरज आहे. खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आपले विचार मांडतांना सांगितले की, प्रत्येकाने छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात वाटचाल करावी. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कायम स्फूर्तीचा, ज्ञानाचा, शौर्याचा आणि अखंडपणे स्वराज्य निर्माणाचा क्रियाशील ध्यास असणारा झरा असल्याचे प्रतिपादन केले. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, शिवरांच्या आदर्शा नुसार गावात एकोपा ठेवा , युवकांनी व्यसनमुक्त व्हावे , उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सर्वांना नेहमीच प्रेरणादायी व ऊर्जादायी ठरेल असे सांगितले.
जळगाव ग्रामीण भागातील सर्वात उंच व अश्वरूप पुतळ्याचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार उमेश दादा पाटील आमदार राजू मामा भोळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील महिला आघाडी प्रमुख सरिताताई – कोल्हे माळी भाजपाचे जिल्हाप्रमुख ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज उद्योगपती बच्छाव सर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फकीरा पाटील, भीमराव मराठे आदींची प्रमुख उपस्थिती होती
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्रीमती सरिता खाचणे यांनी केले. प्रास्ताविक पुतळा कृती समितीचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी केले तर आभार कृती समितीचे सदस्य ज्ञानेश्वर सावळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुतळा कृती समितीचे पदाधिकारी , सदस्य , ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतेले.
कृती समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकच गणवेश परिधान केला होता. गावात प्रमुख रस्त्यावर दुतर्फा काढलेल्या रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. भगवे झेंडे, कमानी, बॅनर यामुळे ममुराबाद परिसर संपूर्ण भगवामय झाला होता. छत्रपतींच्या पुतळ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी – जय शिवराय, जय शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, भाजपाचे जिल्हाप्रमुख ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, माजी सरपंच महेश चौधरी, उपसरपंच आरती पाटील, सचिन पाटील, ग्रा.प. सदस्य भैया शिंदे, भरत शिंदे, शैलेंद्र पाटील, अमर पाटील, शैलेश पाटील, अनिस पटेल, नासिर पटेल, विलास सोनवणे, गोपाल मोरे, प्रीतम पाटील, रंजना ढाके, लताताई तिवारी, अंजना शिंदे, साधना चौधरी, सुनीता चौधरी, वास्तु विशारद विशाल देशमुख, महिला आघाडी तालुकाप्रमुख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, रवी देशमुख, माजी सभापती जनाप्पा कोळी ,मुकुंदराव नन्नवरे, रवींद्र चव्हाण सर, उद्योगपती डी. डी. बच्छाव सर , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, ग्रामसेवक कैलास देसले, तुषार महाजन, कैलास चौधरी, ज्योतीताई चव्हाण, भारती म्हस्के, प्रिया इंगळे, कृती समितीचे अध्यक्ष पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच शिवप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थितीत होते