• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत संतापले : पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 18, 2025
in जळगाव, क्राईम
0
मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत संतापले : पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ मार्च २०२५

गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरात महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. यात काही पोलिस जखमी झाले असून स्थानिक नागरिकांचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चांगलेच संतापले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नागपूरमधील हिंसाचाराची सविस्तर माहिती दिली. तसेच ही घटना पूर्वनियोजित कट असून जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडले जाणार नाही. राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात-धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवानही त्यांनी केले आहे.

नागपूरातील महाल परिसरात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ‘औरंगजेबाची कबर हटाव’ असे नारे देत आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी प्रतिकात्मक कबर जाळली होती. याप्रकरणी गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वातावरण शांत होते. मात्र, सायंकाळी अफवा पसरवण्यात आली की, सकाळी आंदोलकांकडून जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. हे वृत्त पसरल्यानंतर नमाज आटोपून येत असलेल्या 200 ते 250 लोकांच्या जमावाने नारेबाजी सुरु केली. आम्ही आग लावून टाकू, अशी हिंसक भाषा त्यांनी सुरु केली. तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी केल्यानंतर मुस्लीम समुदायाच्या लोकांना पोलिसांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांची तक्रार पोलीस ऐकून घेत होते. तेव्हा हंसापुरी भागात 200 ते 300 लोकांच्या जमावाने हातात काठ्या घेऊन दगडफेक सुरु केली. त्यांच्या तोंडावर फडकी गुंडाळली होती. या जमावाने हंसापुरीत 12 दुचाकींचे नुकसान केले. काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर भालदारपुरा भागात सायंकाळी 7 :30 वाजता 80 ते 100 लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुर आणि सौम्य बळाचा वापर केला. यावेळी जमावाने एक क्रेन आणि काही चारचाकी वाहने जाळली.

या सगळ्यात एकूण 33 पोलीस जखमी झाले. यामध्ये तीन उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. तर एकूण पाच नागरिक जखमी झाले. यापैकी तिघांना घरी सोडण्यात आले आहे. दोन जण रुग्णालयात आहेत, त्यापैकी एकजण अतिदक्षता विभागात आहे. एकूण 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर शहरात एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Tags: #jalgaon#nagpurChief Minister Fadnavis got angry in the Assembly: Those who attack the police will not be spared!

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group