जळगाव मिरर / ९ एप्रिल २०२३ ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती देखील करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी अयोध्येत पोहोचले आहेत. आज रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या मंत्र्यांसोबत अयोध्येला जात आहेत. दोन्ही नेते अयोध्येत प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. त्यानंतर राम मंदिर बांधकामांची पाहणी करणार आहे. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतील. संध्याकाळी दोन्ही नेते शरयू नदीवर महाआरती करतील. शनिवारी सायंकाळपासून सुरू होणारा मुख्यमंत्री शिंदे यांचा दोन दिवसीय अयोध्या दौरा आहे.
