धरणगाव : विनोद रोकडे
येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बाल दिनानिमित्त आनंद मिळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी भूमी रवींद्र पाटील, प्रथमेश फुलपगार, गौरी सुर्धमा पाटील, एकता शाम महाजन, शुभम सतीश बडगुजर या विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आणि मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शक भाषण दिले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेला आनंद मेळाव्याला आरंभ झाला. आनंद मेळावा मध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे, घरगुती वस्तूंचे, गोष्टीच्या पुस्तकांचे, मनोरंजन गेमचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावलेले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अंकिता पवार मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्य वैशाली पवार मॅम, शिक्षिका छाया पाटील, सिमरन खाटीक, मृणाली सोनवणे, शुभांगी पाटील, शीला चौधरी, वैशाली जैन, तहजीब खाटीक, राधा भंडारी, तिलोचना बडगुजर, या शिक्षकांसह माधुरी पाटील, राखी भागवत हे कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
