
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम उत्साहात साजरा
जळगाव मिरर | ७ मार्च २०२६
आर आर विद्यालयात आज, दि. 07/03/2026 रोजी ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक संजय पिले होते, तर व्यासपीठावर टी बी पांढरे, डी टी पाटिल, ए एन सपकाळे, वाय जी चौधरी, एस डी पाटील, जी आर भावसार यांसह इतर शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख एस आर वाणी यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात संजय पिले यांनी सांगितले की, सांस्कृतिक कार्यक्रमांमधील सहभाग विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास करतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घ्यावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश्वरी गायकवाड व यज्ञा पवार यांनी केले, तर आभार सांस्कृतिक कार्यक्रम समिती उपप्रमुख एस एन कोळी यांनी मानले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणे केली, ज्यात गणेश वंदना, ललाटी भंडार, पिंगा ग पोरी पिंगा, शिवबा मल्हारी, गरबा, झुलता पाळणा, नटरंग लावणी, माय भवानी, शिव गर्जना नाटक यांचा समावेश होता. याशिवाय आदिती खंगार यांनी तलवार बाजी सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाच्या यशासाठी जयांशु पोळ, डी एस साबळे, जे एम पाटिल, के जे सोनवणे, जी आर महाजन, वाय बी न्हासदे, व्ही एस रोकडे, आर पी पाटील, आर एम पाटील, दिलीप पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी पारितोषिके वितरित करण्यात आली.




















