जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२४
देशभरातील अनेक मुद्यावर बोलून राज्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड नेहमी वेगवेगळे वक्तव्य करून चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा त्यांनी एक वक्तव्य केल्याने चर्चेत आले आहे.
अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. भाजपकडून या सोहळ्याची मोठी तयारी सुरू आहे. देशभरातून प्रभू रामाच्या मंदिराला अनेक भेटवस्तू दिल्या जात आहेत. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्र यांच्याविषयी मोठं विधान केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याविषयी मोठं विधान केलं. त्याच्या या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. राम हे शाकाहारी नव्हते, ते मांसाहारी असून १४ वर्ष वनवासात राहणारे राम शाकाहारी कसे असतील असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाडांच्या विधानानंतर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.