
जळगाव मिरर / ३ नोव्हेंबर २०२२
राज्यातील शिंदे सरकारमध्ये मंत्री होण्यासाठी शिंदे गटातील भरपूर आमदार उत्सुक आहे. तर काही ठिकाणी आमदार मंत्री पदाबाबत बोलून हि दाखवित्त आहेत. पण पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शहरात जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारे त्यांचे ‘भावी मंत्री’ म्हणून फलक लागल्याने राज्यात आता मंत्रिपदासाठी किशोर पाटील यांची वर्णी लागते का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील यांना शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळाले नाही. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल अशा आशेने त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघात त्यांचे भावी मंत्री म्हणून शुभेच्छा फलक लावले आहेत. आमदार पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुख्यमंत्र्यांनी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे सूतोवाच केलेले आहे. त्यामुळे आमदार पाटील यांना पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. त्यामुळे ही पोस्टरबाजी होत आहे.




















