जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२५
पाचोरा – भडगाव मतदार संघाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आ.किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री ग.भा.नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे वृद्धापकाळाने दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ सोमवार रोजी सकाळी 4: 55 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा पाचोरा येथील राहत्या घरून चिंतामणी कॉलनी भडगाव रोड येथुन दुपारी 3:00 वाजता निघून अंत्यविधी पाचोरा स्मशानभूमी येथे होईल. त्यांच्या पश्चात मुल, सुना, नातवंडे असा मोठा परिवार होय.