
जळगाव मिरर । २२ डिसेंबर २०२२
चाळीसगाव शहरातील खुल्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा तब्बल सात लाख रुपये किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उंबरखेड आडगाव रस्त्यालगत पप्पू सुरेश वाणी यांच्या मालकीच्या गोडावूनमध्ये ही कारवाई झाली.
सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळालेल्या माहितीवरून कारवाई करण्यात आली. उंबरखेड ते आडगाव रोडलगत नीलेश ऊर्फ पप्पू वाणी यांचे मालकीच्या गोडावूनमध्ये शासकीय वितरण प्रणालीचा तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी नेला जात होता. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकला.
सपोनि विष्णू आव्हाड यांनी पंचनामा करून हा ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर पुरवठा निरीक्षक राजेंद्र रामदास ढोले यांनी नमुने तपासणी करून पंचनामा केला. ट्रकमध्ये तसेच खासगी गोडावूनमध्ये ४ लाख ५६ हजार ३९० रुपये किमतीचा तांदूळ, ९ लाख ५० हजार रुपये किमतीचा मालट्रक तसेच २ लाख १४ हजार ५६० रुपये किमतीचा तांदूळ गोडावूनमध्ये आढळून आला. याप्रकरणी नीलेश उर्फ पप्पू वाणी (४०), ट्रकचालक रफीक शहा गफ्फुर शहा (४५, दोन्ही रा. उंबरखेड) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















