जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२५
शहरातील राष्ट्रीय बंजारा टायगर्सतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना ओबीसी राखीव जागेवर व्हीजेएनटी उमेदवारांच्या ओबीसी दाखल्याच्या संभ्रमा संदर्भाबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या जाहीर होणाऱ्या कार्यक्रमानुसार जळगांव जिल्हा परिषद व पंचायत समिती व जळगांव शहर महानगरपालिका यांची निवडणुक होणार आहे. यात ओबीसी आरक्षित जागेवर ओबीसी महिला किंवा पुरुषांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
या संदर्भात महाराष्ट्र व्हीजेएनटी यांना सेंट्रलचे ओबीसी मध्ये गणले जाते. त्यानुसार अर्ज दाखल करतांना व्हीजेएनटीचे कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलीडीटी सर्टिफिकेट जोडावे लागेल की सेंट्रलचे ओबीसी सर्टिफिकेट जोडावे लागेल याचे स्पष्टीकरण करावे. कारण सेंट्रलचे सर्टिफिकेट हे फक्त एका वर्षासाठी वैध असते. त्याची पडताळणी करावी लागेल का याचा खुलासा करुन मिळावा जेणे करुन उमेदवारी दाखल करतांना ओबीसी उमेदवारांचा गोंधळ होणार नाही. यावेळी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, नितीन जाधव यांच्यासह समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.





















