
जळगाव मिरर । ११ डिसेंबर २०२२
जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीचा आज संपूर्ण निकाल जाहीर झाला आहे तर आ.खडसे यांचा गटाचा दारूण पराभव ना.महाजन व ना.पाटील यांच्या गटाने केला आहे. त्यावर निकाल जाहीर झाल्यानंतर आ.एकनाथराव खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, सत्ताधारी पक्षाचे २ मंत्री ५ आमदार २ खासदार हे जिल्हा दुध संघाच्या निवडणूकित काम करत होते. या निवडणुकीमध्ये शेवटी खोके भारी पडल्याची टीका विरोधकावर चांगलीच टीका केली आहे. आम्ही जवळपास १०० कोटी रुपयाचे प्रकल्प आम्ही उभे केले त्यावर शेवटी खोकेच भारी पडले आहे.
खडसे म्हणाले कि, या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर सत्ता पैसा सर्व काही त्यांनी वापर केला त्यामाध्यमातून त्यांना यश मिळविण्यात मदत झाली, हा पराभाव आता आमच्या कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागला आहे पुढील येणाऱ्या निवडणुकीत आमचा कार्यकर्ता वचपा काढतील, निवडणुकीत यश अपयश सुरूच राहते, सर्व मंत्री आमदार मत मागत आहेत तर आम्ही एका बाजूला असी हि निवडणूक पार पडली. विकासावर खोके भारी पडले आहे, गेल्या ६ वर्षाची चौकशी त्यांनी जरूर करावी ६ वर्षामध्ये आम्ही हिताचे काम केले आहे ते सत्तेमध्ये आलेले आहेत त्यांनी चौकशी करावी. निवडणुकीत आश्वासन देण्याचे काम मंत्री गिरीश महाजन हे करीत असतात. यापूर्वी जळगाव मनपात त्यांनी आश्वासन देवून सत्ता घेतली होती पण आज तुम्हाला जळगाव मनपाची स्तिथी दिसत आहे. दुध संघात वेगळी परिस्थिती होईल असे वाटत नाही.
मंत्री पाटलांनी मला आमदारकी दिली नाही त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद आहे व आम्ही वाढवलेली आहे, आम्ही सर्व निडणूका एकत्र लढविली आहे. आमच्यासोबत मतदार कोण आहे यात पुढे सुधारणा होणार आहे. अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली.



















