जळगाव मिरर | ३० मे २०२३
गेल्या काही दिवसापासून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून असलेल्या महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा राज्यभर गाजत होती. कारण देखील तसेच काही होते. पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी कॉंग्रेसचे नेते कामाला लागली आहे. पण या मतदार संघात कॉंग्रेस निवडून येत नसल्याने हि जागा राष्ट्रवादीला देण्यात यावी असा अट्टाहास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केल्याने कॉंग्रेस नेते नाना पटोले व अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे देखील घडले होते.
भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून सध्या दावे-प्रतिदावे केले जात आहे. कॉंग्रेसकडून या जागेसाठी आता आपला उमेदवारही घोषीत करून दिल्याने एकच चर्चा रंगली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेस सुरू आहे. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसमध्ये या जागेवरून दावे ठोकले जात आहेत. तर काॅंग्रेसकडून आता या निवडणुकीसाठी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे आगामी या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येणार आहे. ? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात आमदार रविंद्र धंगेकरांना काॅंग्रेस रिंगणात उतरवण्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धंगेकरांना तयारीचे आदेशही दिले आहे. त्यामुळे एकिकडे पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला असतानाच दुसरीकडे मात्र काॅंग्रेसने उमेदवार निश्चित केल्याने एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.