जळगाव मिरर | २० मे २०२५
जळगाव शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात आहे मात्र बांधकाम कामगार भांडी योजना या शासकीय योजना सुरु असून ज्या लाभार्थींना बांधकाम कामगाराचे कार्ड मिळाले आहे त्यांना आता मात्र भांडी घेण्यासाठी वणवण भटकत पैसे देवून भांडी घ्यावी लागत आहे. या भांडी वाटप करणारा ठेकेदार कुठलेही फलक व ठिकाण न सांगतो, पैसे देणाऱ्या लाभार्थींना घरी जावून भांडी देत आहे. यामुळे या विभागातील भोंगळ कारभार समोर आला आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळद्वारे बांधकाम कामगार भांडी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत, पात्र बांधकाम कामगारांना घरेलू भांडी सेट मोफत दिला जात असतो. यात 30 वस्तूंचा हा सेट असून कामगारांना स्वतःचे स्वयंपाक घर बनवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो मात्र या योजनेच्या नावाखाली जळगाव शहरासह ग्रामीण भागात या योजनेच्या नावाखाली मोठी आर्थिक लुट होत आहे. यावर प्रशासकीय यंत्रणा कुठलेही लक्ष देत नसल्याचे उघड झाले आहे.
‘भांडी’ घेण्यासाठी आठशे ते बाराशे रुपये लागतात मोजावे !
जळगाव शहरातील अनेक परिसरात बांधकाम कामगारचे कार्ड बनवून घेतले आहे मात्र या योजनेतील ‘भांडी’ घेण्यासाठी शहरातील कुठल्याही परिसरात भांडी वाटप करण्याचे कॅम्प लावण्यात येत नसल्याने काही लाभार्थींना या योजनेच्या माध्यमातून भांडी ठेकेदारचे माणसे पैसे घेवून थेट घरपोच रात्रीच्या सुमारे पोहचवत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक गरजू नागरिकांना हजारो रुपयांचा फटका बसत आहे. हि आर्थिक लुट शासनाच्या मर्जीने होत आहे का असा सवाल देखील उपस्थित होत आहे.