
जळगाव मिरर | २० मे २०२५
जळगाव शहरात बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात असून राज्य सरकारच्या अनेक योजना कामगारांसाठी असतात आता भांडी योजना मोठ्या प्रमाणात सुरु असतांना यात आता लाभार्थीचे केवायसी करण्यासाठी शहरात ‘केवायसी’ केंद्र कुठेही दिसून आलेले नाही मात्र शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका खाजगी व्यक्तीच्या घरी हि ‘केवायसी’ करून मिळत असल्याने या परिसरात शेकडो महिलांनी मोठी गर्दी केली होती.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळद्वारे बांधकाम कामगार भांडी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत, पात्र बांधकाम कामगारांना घरेलू भांडी सेट मोफत दिला जात असतो. यात 30 वस्तूंचा हा सेट असून कामगारांना स्वतःचे स्वयंपाक घर बनवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. मात्र जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून या योजनेतील भांडी वाटपचे केंद्र कुठे आहे हे देखील लाभार्थीना माहित नसल्याने त्यांचे ‘केवायसी’ देखील होवू शकत नाही आहे. मात्र काही व्यक्ती खाजगी घरामध्ये ‘केवायसी’ करून लाभार्थीच्या घरापर्यत भांडे पोहचवीत असल्याच्या चर्चा ‘केवायसी’ होत असलेल्या ठिकाणी दबक्या आवाजात सुरु होती.
‘केवायसी’च्या नावाखाली फसवणूक ?
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील एका खाजगी घरात आज दि.२ जून रोजी दुपारी ११ वाजेपासून सुरु करण्यात आले होते. यावेळी शेकडो महिलांची लांबच लांब रांग लागली होती. यावेळी ‘केवायसी’करून घेवून येत्या दोन ते चार दिवसात या लाभार्थीना थेट घरपोच भांडीचा सेट मिळणार असल्याची देखील चर्चा या परिसरात सुरु होती. त्यामुळे या योजनेतील ठेकेदार चक्क लाभार्थ्यांना घरापर्यत भांडीचा सेट पोहचवीत असल्याने अनेक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.




















