
जळगाव मिरर / ८ जानेवारी २०२३
गेल्या काही दिवसापासून एका परिसरातील गटारीमध्ये घाण अडकल्याने येथील काही नागरिकांनी स्वतःहून गटारीतील घाण काढली आहे. तर या परिसरातील नगरसेवक व मनपा प्रशासन झोपेत आहेत, असेच म्हणावे लागेल.
शहरातील खडके चाळ या परिसरात कामगार व हाजमजूरी करून आपला उदरनिर्वाह करणारे नागरिक राहतात. परिसरातील गटारीमध्ये प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यता आले असतांना देखील मनपा प्रशासनास व नगरसेवकांना वारंवार तक्रारी करून देखील येथील स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी स्वतःहून गटारीची साफसफाई करून आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण यावर नगरसेवकांवर कुठलाही फरक पडत नाही, या प्रभागात चार नगरसेवक असून देखील अशी अवस्था होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी या मूलभूत सुविधेची अपेक्षा कुणाकडून करावी असा देखील प्रश्न यावेळेस उपस्थित होत आहे. या परिसरातील उमेश मांडोळे, नाना पाटील, भूषण मांडोळे, शरद शेवाळे, राजू मोरे यांनी ‘जळगाव मिरर न्यूज’ कडे आपली व्यथा मांडली आहे. याबाबत झोपलेले नगरसेवक व मनपाचे आरोग्य विभाग कधी लक्ष देणार याकडे जनतेचे लक्ष आहे.



















