
जळगाव : प्रतिनिधी
अयोध्या नगर येथील राम मंदिर ग्राउंड याठिकाणी अयोध्या ग्रुप संचलित अयोध्या नगर नवदुर्गा उत्सव मित्र मंडळामध्ये गेल्या ८ वर्षापासून भव्य असा दांडिया , गरबाचा उत्सव भरत असतो. विशेष म्हणजे मंडळात दांडिया स्पर्धेत फक्त महिला माता बहिणींना प्रवेश असतो. परिसरातून भाविक भक्तांची प्रचंड गर्दी या ठिकाणी जमलेली असते.
स्पर्धकांना मंफळातर्फे वेगवेगळी आकर्षक अशी बक्षिसे रोज दिली जातात . सामूहिक होम हवन तसेच देवीच्या पाठा चे वाचन आयोजित केले जाते.
तसेच मंडळाला दरवर्षी राजूमामा भोळे , सुनील खडके, नगरसेवक विरण खडके, रंजनताई वानखेडे, प्रदिप रोटे परिसरातील वरीष्ठ नागरिक यांचे अनमोल असे सहकार्य लाभत असते.




















