जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२५
दिल्लीतील हरिनगरमध्ये शनिवारी पावसादरम्यान भिंत कोसळल्याने एक अपघात घडला आहे. जैतपूर पोलिस स्टेशनच्या हरिनगरमधील बाबा मोहन राम मंदिराजवळील समाधी स्थळाची भिंत कोसळल्याने सुमारे आठ जण गाडले गेले. या अपघातात सर्व आठ जखमींचा मृत्यू झाला आहे. अपघातातील आठ जणांमध्ये तीन पुरुष, दोन महिला, दोन मुली आणि एक मुलगा आहे. सात जणांच्या मृत्यूनंतर, जखमी हाशिबुलवर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचाही मृत्यू झाला आहे.
दिल्ली अग्निशमन विभागाने आठही जणांच्या मृत्युला पुष्टी दिली आहे. या अपघातात शबीबुल ३०, रबीबुल ३०, मुत्तू अली ४५ हे तीन पुरुष, रुबिना २५ आणि डॉली २५ या दोन महिला, रुखसाना ६, हसीना ७ या दोन मुली आणि हाशिबुल नावाच्या मुलाचा मृत्यु झाला आहे. मृत्यूची माहिती देण्यापूर्वी, अतिरिक्त डीसीपी दक्षिण पूर्व ऐश्वर्या शर्मा म्हणाल्या की येथे एक जुने मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी जुन्या झोपडपट्ट्या आहेत. तिथे भंगार विक्रेते राहतात. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. अपघातात आठ लोक अडकले, ज्यांना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आम्ही आता या झोपड्या रिकाञा केल्या आहेत. यापूर्वी, दक्षिण पूर्व दिल्लीतील जैतपूर भागात असलेल्या हरी नगरमध्ये इमारत कोसळल्याची नोंद झाली होती. नंतरच्या तपासात असे दिसून आले की ही घटना इमारत कोसळल्याची नाही तर भिंत कोसळल्याची होती.
