अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेल्या दाऊद ऊर्फ शुभम देशमुखला पोलिसांनी शुक्रवारी धुळे शहरातून ताब्यात घेतले आहे.
शुभम याच्यावर पोलिसांत जबरी चोरी, खुनासह दरोडा, घरफोडी व इतर २७ गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शुभमला पकडण्याचे आदेश दिले होते. शुभम हा शुक्रवारी धुळे येथे आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त बहिणीकडे येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानंतर त्याला बहिणीच्या घरातूनच अटक करण्यात आली.
उपनिरीक्षक अनिल भुसारे, हेकॉ. सुनील हटकर, मिलिंद भामरे, सूर्यकांत अमळनेर साळुंखे, अमोल पाटील, नीलेश मोरे, समाधान पाटील आदींनी ही कामगिरी बजावली. दाऊद उर्फ शुभम याच्यावर या आधीही काही गुन्हे दाखल आहेत. त्याची अमळनेर भागात दहशत होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्याला अटक करण्यात आली आहे.





















