जळगाव मिरर | २१ एप्रिल २०२४
लग्नाच्या कार्यक्रमासाठी रिक्षाने जात असतसांना अचानक चालकाचा रिक्षावरील ताबा सुटून रिक्षा उलटली. या अपघातात भिवसन खंडू कोळी (वय ५०, रा. पाळधी, ता. धरणगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना घटना शनिवार दि. २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे घडली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आल्यानंतर याठिकाणी नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे भिवसन कोळी हे आपल्या पत्न ी आणि दोन मुलांसह वास्तव्याला असून ते मजूरीचे काम करून ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने भिवसन कोळी हे शनिवारी दुपारी १२ वाजता (एमएच १९, सीडबल्यू २८११) क्रमांकाच्या रिक्षाने निघाले होते. धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावाजवळून जात असतांना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. यामध्ये भिवसन कोळी हे रिक्षा खाली दबले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी मयत घोषीत केले.
रिक्षा उलटून झालेल्या अपघातात कोळी हे गंभीर जखमी झाल्याची माहिती कळताच त्यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषीत करताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्न सरला, मुलगा अजय आणि मुलगी सविता असा परिवार आहे.
पाळधी येथून निंभोऱ्याकडे जात असलेल्या रिक्षात चालकासह अन्य तीन प्रवासी होते. रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालक भिवसन कोळी यांचा मृत्यू झाला तर अनुबाई तुकाराम बिऱ्हाडे (वय ५५, रा. पाळधी, ता. धरणगाव) यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली तर चालक समाधान कोळी हा किरकोळ जखमी झाला आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.