जळगाव मिरर | २३ जुलै २०२५
जळगाव शहरातून हद्दपार केलेल्या समाधान हरचंद भोई (वय ३२, रा. खंडेराव नगर) हा कोयता घेवून दहशत माजवित असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली.
त्यानुसार गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सचिन रणशेवर, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, जितेंद्र राठोड, जितेंद्र राजपूत, सुशिल चौधरी, अतुल चौधरी, योगेश बारी यांच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून धारदार कोयता जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्य आदेशानुसार दोन वर्षांकरीता हद्दपार करण्यात आले आहे. परंतु तो कुठलीही परवानगी न घेता शहरात आल्यामुळे त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सुधाकर अंभोरे हे करीत आहे.
