जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२३
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्युनंतर सेलिब्रिटीसह चाहत्यांमध्ये मोठी खळबळ माजली असून सध्या सर्वत्र नितीन देसाई यांच्या निधनाची जोरदार चर्चा सुरु आहे. नितीन देसाई यांनी टोकाचा निर्णय का घेतला? त्यांच्यावर असलेलं कर्ज? त्यांच्या मनात सुरु असलेली घालमेल? अशा अनेक चर्चा नितीन देसाई यांच्या निधनानंतर सुरू आहे.
माहितीनुसार, नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळ ४.३० च्या सुमारास स्वतःचं जीवन संपवलं आहे. पोलीस देखील प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. पण आर्थिक अडचणी वाढल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं. अशी माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट देखील समोर आले आहेत. चार डॉक्टरांच्या टीमकडून नितीन देसाई यांचा पोस्टमार्टम पूर्ण झाला आहे. नितीन देसाई यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये स्वतःला संपवलं. निधनानंतर चार डॉक्टरांच्या टीमने पोस्टमार्टम प्रक्रिया पूर्ण केली आहे. रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं की, ‘दिग्दर्शक नितीन देसाई यांचं चार डॉक्टरांच्या टीमने पोस्टमॉर्टम केलं आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचं कारण गळफास असल्याचं समोर येत आहे. पुढील तपास सुरू आहे.’ सध्या सर्वत्र नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल का उचललं? अशी चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात आणला. बुधवारी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, “त्यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले आहे की, त्यांचे अंत्यसंस्कार एनडी स्टुडिओमध्ये होणार आहेत. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आला आहे.”
