जळगाव मिरर | ३१ जानेवारी २०२४
रस्त्याने घरी पायी जात असताना दुचाकीवरून धूम स्टाईलने आलेल्या दोन जणांनी रुचीलक्ष्मी काबरा (वय ४५, रा. अभियंता कॉलनी) यांच्या गळयातील सोन्याची चैन व मणी, मंगळसूत्र असलेली पोत चोरून नेली. ही घटना सोमवार दि. २९ जानेवारी रोजी रात्री हनुमान कॉलनीत घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुचीलक्ष्मी काबरा या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून सोमवार दि. २९ जानेवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास त्या घराकडे पायी जाण्यासाठी निघाल्या. त्या वेळी दुचाकीवरून दोन जण आले व या महिलेच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीची साडे चार ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ४७ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची मणी, मंगळसूत्र असलेली पोत असा एकूण ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ओढून नेला. महिलेने परिसरात चोरट्यांचा शोध घेतला, मात्र ते न सापडल्याने त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रोहिलास गभाले करत आहेत.