राष्ट्रसंत निष्काम कर्मयोगी, गाडगे बाबा यांचे विचार टिकवण्यासाठी युवकांनी आता तरी एकत्र यावे.. काल परवा मी फेसबुकवर एक पोस्ट वाचली. विजय शेंडगे म्हणुन कुणीतरी स्वयं घोषित लेखक आहेत त्यांनी आपले मत फेसबुक वर मांडले होते. पोस्ट वाचत असताना माझी तळपायाची आग मात्र मस्तकात जात होती त्या पोस्टच शीर्षक होत गाडगे बाबा माझे आदर्श नाहीत… कोण कुणाचे आदर्श असावेत हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना गुरु मानले आणि कर्मवीर भाऊराव पाटील, राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे जे जिवलग सहकारी होते असे गाडगे बाबा विजय शेंडगे तूमचे तर आदर्श होऊच शकत नाही. कहा राजा भोज और काहा गंगू तेली..महाशय आपण सोशल मीडिया वर व्यक्त होतोय पण आपण व्यक्त होत असताना आपण कुणावर व्यक्त होतोय आणि कुणाबद्दल काय अपशब्द बोलतोय त्याचे समाजावर काय परिणाम होतील हे देखील आपण पाहिले पाहिजे..हे जे कुणी महाशय आहेत विजय शेंडगे त्यांना मी सांगू ईच्छितो गाडगे बाबा यांचा देवाकडे पाहण्याचा विज्ञान वादी दृष्टिकोन आपण कधी जाणुनच घेतला नाही .
बाबांची दशसुत्री आपण कधीच अभ्यासली नाही.. बाबांचा देवाला कधीच विरोध न्हवता ते तर स्वतः कीर्तन, भजन करत, त्याची सुरुवात च ते गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाने करत.माझ्या माहितप्रमाणे आणि अभ्यासाप्रमाणे गरिबांना दोन वेळच गोड धोड खायला मिळावे आणि कुणी उपाशी राहू नये म्हणुन त्यांनीच हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली(संदर्भ गाडगे बाबा या पुस्तकात उल्लेख) बाबा स्वतः हिंदू होते स्वतः गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे भजन करत मग यात देवतांची खिल्ली कुठे उडाली. बाबांनी कधीच देवाचे अस्तीत्व नाकारले नाही. उलट लोकांच्या मनातील अंधश्रध्देची जळमाट त्यांनी काढली.आपण बाबांचा एकेरी उल्लेख केला अरे तुरे केले… यातुन आपले संस्कार दिसून येतात.तुम्ही प्रश्न केलात कि गाडगे बाबा यांचा धंदा काय?आता मी तुम्हाला सांगतो गाडगे बाबा यांचा धंदा काय होता. ते परिट म्हणजेच धोबी समाजात जन्मला आले परिस्थिती गरीब आणि वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्या मामा नी त्यांचं संगोपण केलं. कुणावर आपण बोझ नको म्हणून त्यांनी स्वाभिमानाने शेती केली आणि गुरे चारली .. काही कालावधीने त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले आपल्या घराचा त्याग केला आणि भिक्षा मागून आपले पोट भरले . हि मायबाप जनताच त्यांचे पोट भरत होती.. त्याना जे दान येत होते त्याचा त्यांनी कधीचं स्वतः साठी वापर केला नाही बायकोला देखिल ताकीद दिली की हे लोकांचे पैसे आहेत. ते लोकांसाठीच वापरले जावेत.कर्मवीर भाऊराव पाटील यांना शाळेसाठी मदत केली, धर्मशाळा बांधल्या, शाळा काढल्या, अनाथ आश्रम काढले. गौशाळा बांधली, नदीवर घाट बांधले.
आपण गाडगे बाबा यांच्यावर संशोधन करण्याइतपत आपले कर्तुत्व आधी आपण तपासावे. कारण आपण सूर्यावर थंकण्याचा प्रयत्न करत आहात. ज्यांच्या नावाचे एक विद्यापीठ आहे, अनेक शाळा आहेत, कॉलेज आहेत, अनेक संस्था आहेत आणि आपण कोण आहोत त्यांना बोलणारे याचा थोडा विचार करा.
विजय शेंडगे आपल्यात कधीच गाडगे बाबा यांचे चरित्र लिहिण्याची पात्रता येऊ शकतं नाही..आणि आपण कृपया लिहु पण नये. कारण गाडगे बाबा यांचे चरित्र बाळा साहेब ठाकरे यांचे वडिल केशव उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांनी आधीच लिहून ठेवलं आहे.आपण एकदा वेळ भेटला तर नक्की वाचावे… थोडा का होईना आपल्या बुध्दीवर नक्किच प्रकाश पडेल.
आता माझी साहित्य प्रेमी आणि प्रकाशकांना विनंती असेल की आपण कुणाचे लिखाण वाचतोय,प्रसिद्ध करतोय किंवा छापतो आहे याचा आपण थोडा विचार करावा. उठ सुठ ज्यांची पात्रता नाही आशा लोकांना आपण जर मोठे करत असला आणि ते आपल्या तोंडातून जर असेच गरळ ओकत असतिल तर मग आपण त्यांची आणि आपलीच पात्रता ओळखावी.
मला एक प्रश्न पडलाय की लोकं पण अश्या लोकांना कसा भाव देतात काय माहीत l. काल परवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल असलेल्या भावनांवर देखिल याच इसमाने टीका केली आणि आता गाडगे बाबा यांच्यावर असे आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला . सरकार यावर काही कारवाई करणार आहे की नाही.. पोस्ट डिलिट करून फक्तं आपण सांत्वन मिळवले आहे पण जर आपण समाजाच्या आणि गाडगे बाबा प्रेमीच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांचं काय त्याचा विचार केलाय का … त्या व्यक्तीने साधी समाजाची माफी देखील मागितली नाही आणि लोकं अश्या व्यकीला मोठं करतात…
आता तरी सरकारने पुढाकार घ्यावा आणि महापुरुषांबद्दल जी काही गरळ ओकली जाते आणि त्यांचा अपमान केला जातोय यावर योग्य शासन करावे एवढी नम्र विनंती.
प्रा. सौरभ चंद्रकांत नवले
रहस्यकवी
(संत गाडगेबाबा विचार प्रसारक)
महाराष्ट्र राज्य-संघटक
(संत गाडगेबाबा विचार मंच महाराष्ट्र राज्य )
पुणे जिल्हा प्रवक्ते
(डेबूजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य)