जळगाव मिरर | २७ जून २०२४
राज्यातील महायुती सरकारचा आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांना अभिवादन केले. तेव्हा अजित पवार त्यांच्यासोबत नसल्याने चर्चांना उधाण आले. तर काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात डबल इंजिन सरकार येईल असे वक्तव्य केले, यामुळे महायुतीत नाराजी नाट्य सुरू आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनाच्या परिसरात असलेल्या शिवरायाच्या स्मारकास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारकडून शिवरायांना अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात डबल इंजिन सरकार येईल, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशात विरोधक त्यांना याच मुद्द्यावरुन डिवचू शकतात. दरम्यान मुंबईत माध्यमांशी संवाद साधतांना त्यांना महायुतीतील घटक पक्ष नाराज असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आले होते. यासंदर्भात बोलताना महायुती पक्की असून राज्यात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
संघाचे मुखपत्र असो किंवा मग रामदास कदम.. लोकसभा निकालानंतर पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडण्यात आलं होतं. त्यामुळे अजित पवारांच्या गटात नाराजी असल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे जागावाटपावरुनही अजित पवार गटाने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतलीय. 2019 मध्ये तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या 121 जागा लढवल्या होत्या. आताच्या विधानसभा निवडणुकीत 80 ते 100 जागांची मागणी अजित पवारांच्या गटाने केली आहे.