
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असलेले लिनेस क्लब जळगाव व सेवारथ परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव जिल्हा रुग्णालयात बाळंतीण महिलांना पोषक आहार मिळावा या हेतूने खारीक आणि खोबरे यांच्या पाकिटाचे वाटप करण्यात आले. तसेच नवजात शिशुंना झबले देण्यात आले.
यांनी घेतला पुढाकार
लिनेस सदस्या सौ.शकुंतला बागरेच्या व सेवारथच्या नीलिमा सेठिया यांनी मदत केली. यावेळी क्लबच्या अध्यक्ष दर्शना ललवाणी ,सेक्रेटरी शैला छोरीया सामाजिक कार्यकर्ते दिलीप गांधी, मनिषा पाटील, अलका पगारिया, विद्या जकातदार, उज्वला मुथा, चंद्रकला सुराणा आदी सदस्य उपस्थित होते.




















