जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२५
विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा वाघ नगर येथे सीड बँक च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सीताफळ बिया रुजवून सीताफळ रोपवाटिका तयार केली व तेच रोप विदयार्थ्यांना संगोपणासाठी शाळेतून देण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील , समन्वयक श्री सचिन गायकवाड , समन्वयिका सौ भाग्यश्री वारुडकर तसेच ज्येष्ठ शिक्षिका सौ जयश्री वंडोळे ,सौ वैशाली पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
सीड बँक संकल्पना – शालेय स्तरावर सीड बँक हा एक आगळावेगळा प्रकल्प आहे यात विद्यार्थी स्वतः बियांचे संकलन करतात. संकलन केलेल्या बियाण्यांची प्रत, कोणत्या फळाचे ते बी आहे त्या फळाचे वनस्पती शास्त्रातील नाव विद्यार्थी स्वतः शोधतात.घरी खाण्यात येणाऱ्या फळांच्या बिया धुवून वाळवून शाळेत संकलित करतात. त्या बियाण्यांवर स्वतः पावडर कोटिंग करून त्या बिया साठवतात
उद्देश – विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फळे खावीत.
विद्यार्थ्यांना जतन व संवर्धन समजावे. बियाण्यांचा वापर करून विविध रोप तयार करण्याची प्रक्रिया समजून घेणे. बियांचे प्रकार व त्यापासून येणाऱ्या रोपाचे निरीक्षण करणे. बियावर पावडर कोटिंग करण्याची प्रक्रिया करणे. विविध फळ, भाज्या फुले यांच्या बियांचे संकलन करणे. अशा प्रकारचा सीड बँक प्रकल्प विद्यार्थ्यांद्वारे राबवला जातो सद्यस्थितीत सीड बँकेत विविध भाज्या, फळे, फुले, यांच्या बिया यांचे संकलन आहे. प्रशासकीय अधिकारी मा. श्री दिनेश ठाकरे यांच्या संकल्पनेतून सीड बँक हा प्रकल्प सुरू आहे