जळगाव मिरर / ११ डिसेंबर २०२२
क्रीड़ा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीड़ा परिषद, जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका जळगाव, जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय महानगरपालिका क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धा २०२२-२०२३ आज दी.११/१२/२०२२ रविवार रोजी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सदर स्पर्धा उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोझलॅन्ड इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या सभासद सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या सानिया रोझ प्रधान मॅडम, डलन ब्राउन मॅडम, तसेच प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र राज्य क्रीड़ा शिक्षक महासंघाचे वरिष्ठ सहसचिव आदरणीय गुरुवर्य श्री.राजेश जाधव, जळगाव शहर महानगर पालिका क्रीड़ा समन्वयक तथा टेबल टेनिसचे आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री.विवेक आळवनी, जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय जळगावचे खो-खो राज्य क्रीड़ा मार्गदर्शक श्री.मिनल थोरात, प्रा.हाजी इकबाल मिर्झा, प्रा.डॉ. विजय पाटिल यांची उपस्थिति होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएसनचे प्रभारी सचिव श्री.जितेंद्र शिंदे यांनी केले.
आज दी.११ डीसेंबर रोजी १४ वर्षा आतिल मुले व मूली स्पर्धेसाठी जळगाव महानगर क्षेत्रातुन ११ मुले व ८ मूली संघ सहभागी झाले होते सदर वयोगटात मुलां मध्ये विजयी- सेंट जोसेफ हायस्कूल उपविजयी- विद्या इंग्लिश मीडियम स्कूल तृतीय- सेंट टेरेसा हायस्कूल तर मुलीं मध्ये विजयी-सेंट जोसेफ हायस्कूल उपविजयी- सेंट टेरेसा हायस्कूल तृतीय- पोदार इंग्लिश मीडियम स्कूल
शालेय बास्केटबॉल स्पर्धा यशस्वितेसाठी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन सचिव श्री.गिरीश पाटिल, आणि महा बास्केटबॉल असोसिएशन महाराष्ट्र राज्य खजिनदार आदरणीय गुरुवर्य श्री.जयंत देशमुख यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली श्री.दिनेश पाटिल, श्री.वाल्मीक पाटिल, श्री.आशीष पाटिल, श्री.निखिल झोपे, श्री.वसीम शेख, श्री.लौकिक मुंदडा, श्री.जावेद शेख, कुमारी सोनल पाटील, श्री.भगवान महाजन, श्री.जितेंद्र शिंदे हे पंच म्हणून काम पहात आहे उद्या १७ वयोगट मुले मुली स्पर्धा होणार आहेत.
