
जळगाव मिरर | ७ मार्च २०२६
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका अंदाजे ४६ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शासकीय रुग्णालयाचे सीएमओ डॉ. निरंजन देशमुख यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याला या घटनेबाबत माहिती दिली. ५ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान या व्यक्तीची प्राणज्योत मालवली. मयत व्यक्तीचे नाव आणि पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. त्यांचे वय अंदाजे ४६ वर्षे असून, ते कोठून आले होते याचा तपास पोलीस करत आहेत. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता वाघमारे हे करीत आहे.




















