जळगाव मिरर / ५ फेब्रुवारी २०२३
नशिराबाद येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात नागरिकासाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले होते. यावेळी [परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.
जळगाव शहरापासून जवळच असलेले नशिराबादमधील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री मधुदत्त हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात हृदयरोग, ब्लडप्रेशर यासह ईसीजीची तपासणी करण्यात आली. नशिराबादमधील 120 नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला होता. या शिबीरास डॉ.तेजस राणे, अर्जुन साठे, प्रतिक सोनार आदींची उपस्थिती होती.
