
जळगाव मिरर | २५ मार्च २०२६
रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य तज्ज्ञ डाॅ. सतिश गोगुलवार यांचे आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर जाहिर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवार, दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सायं. ७.३० वाजता, रोटरी हॉल, गणपती नगर, जळगाव येथे व्याख्यान होणार असून यावेळी सातपुड्यातील आदिवासी भगिनींनी मोहफुलांपासून बनविलेल्या पौष्टिक पदार्थांचे सादरीकरणही करण्यात येणार आहे.
व्याख्यान सर्वांसाठी खुले असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.




















