जळगाव मिरर । २२ ऑक्टोबर २०२२
दसऱ्यापासून सोने व चांदीच्या दरात जरी घसरण होत असली तरी दिवाळीच्या सणाच्या काही दिवसा आधी सोने चांदीचा भाव वाढलेला होता. पंरतु आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरीदाचा ग्राहकांना चांगला लाभ घेता येणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सोने चांदी महागलं होतं. पण दिवाळीत होत असलेली दरातली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,280 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,480 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 557 रुपये आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई – 50,890 रुपये
दिल्ली – 50,600 रुपये
हैदराबाद – 50,440 रुपये
कोलकत्ता – 50,440 रुपये
लखनऊ – 50,590 रुपये
मुंबई – 50,440 रुपये
नागपूर – 50,470 रुपये
पुणे – 50,470 रुपये
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.