जळगाव मिरर / ५ फेब्रुवारी २०२३
अमळनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीला जोर आला असून, महसूल पथकाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत होते. तापी नदीवरील जळोद येथून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर महसूल पथकाने पकडून पोलिस ठाणे जमा केले आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शनिवारची सुट्टी असल्याची संधी साधत तापी नदीतून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच शनिवारी ४ रोजी पहाटे नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, मंडळ अधिकारी व्ही. पी. पाटील, मंडलाधिकारी चौधरी, तलाठी जितेंद्र पाटील, तलाठी ए. बी. सोनवणे, संदीप शिंदे, प्रकाश महाजन, सतीश शिंदे, भुपेश पाटील, मधुकर पाटील, प्रदीप भदाणे, तिलेश पवार, बळीराम काळे, वाय. आर. पाटील यांच्या पथकाला जळोद गांधली रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ सागर रमेश कोळी हा (एमएच १९, झेड १९७०) या डंपरमधून चार ब्रास अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आला.
