
जळगाव : प्रतिनिधी
जळगावहुन भादलीकडे जाणाऱ्या महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने ५५ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास घडली आहे.
सविस्तर असे की, शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावर हाॅटेल त्रिमूर्तीजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला (एचअार ३८ ए ७२२२) त्यांनी जाेरदार धडक दिल्याने भादली येथील रहिवासी हरेश्वर गाेपाळ चाैधरी हे जागीच मृत्यू झाला आहे. ते एमअायडीसीतील बाॅयलर कंपनीत कामाला असलेले हरेश्वर चाैधरी हे रात्री अाठ वाजता शिफ्ट संपल्यावर अापल्या दुचाकीने (एमएच १९ बीएल २८९९) जात असताना हाॅटेल त्रिमूर्तीजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला (एचअार ३८ ए ७२२२) त्यांनी जाेरदार धडक दिली. चाैधरी यांच्या डाेक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी एमअायडीसी पाेलिसात नाेंद करण्यात अाली. मृत चाैधरी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अाणि मुलगी असा परिवार अाहे.




















