जळगाव मिरर | १४ जुलै २०२३
गेल्या अनेक वर्षापासून भारताची महत्वाकांक्षी मोहिम असलेलं चांद्रयान यशस्वीरित्या ३ लॉन्च करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन हे २.३५ मिनिटांनी लॉन्च झालं. अवघ्या देशाचं याकडं लागलं होतं. यावेळी केंद्रातील अनेक मंत्री अंतराळ केंद्रात उपस्थित होते. अवघ्या देशानं हा सोहळा टीव्हीवर लाईव्ह पाहिला.
चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणानंतर 3 वर्षे, 11 महिने आणि 23 दिवसांनी शुक्रवारी भारताने चांद्रयान-3 मिशन लॉंच केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट LVM3-M4 द्वारे ते अवकाशात पाठवले. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ इतर शास्त्रज्ञांसह मिशन कंट्रोल रूममध्ये आहेत. या मोहिमेद्वारे भारताला आपली अंतराळ शक्ती जगाला दाखवायची आहे. मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल.