जळगाव मिरर । २ जून २०२३
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधान सभेचे विरोधी पक्षनेते ना अजित पवार दि. १६ जुन रोजी अमळनेर दौऱ्यावर येणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.दि.१६ जून रोजी अमळनेर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश ग्रंथालय विभागाच्या एक दिवसीय शिबिराचे आयोजन अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित केलेले आहे.
या शिबिराचे उद्घाटन शरद पवार यांच्या शुभहस्ते व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातील अनेक नेते अनेक विभागांचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी या शिबिराला उपस्थित राहणार आहेत.
