चाळीसगाव : कल्पेश महाले
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका आश्रमशाळेच्या ग्रंथपालाने ७ हजारांची लाच स्वीकारताना त्याला जळगावच्या लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. कालबद्ध वेतनश्रेणी मंजुरीसाठी हि लाच स्वीकारली आहे. श्रीकांत गुलाब पवार (38) असे ग्रंथपालाचे नाव असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करगाव आश्रमशाळेचे ४१ वर्षीय कर्मचारी असून तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी यापूर्वी ऑनलाईन पवार यांनी 15 हजारांची लाच स्वीकारली होती व त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक, येथून पदोन्नतीची थकीत रक्कम 85 हजार 519 रुपये मंजूर करून देण्यासाठी १६ टक्केप्रमाणे 12 हजारांची लाच पवार यांनी मागितल्यानंतर त्यामध्ये तडजोड होवून सात हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवताच सापळा रचून तो यशस्वी करण्यात आला.
यांनी केली कारवाई
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख , पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे व पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, नाईक सुनील वानखेडे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हि कारवाई केली .




















