जळगाव मिरर । २० सप्टेंबर २०२३
प्रत्येक घरातील जेष्ठ व्यक्ती हे घरातील विदुत उपकरण कामाशिवाय जास्त वेळ चालू ठेवत नाही कारण विजेचे येणारे बिल अनेकांना हैराण करून सोडत असते. आपण घरात २४ तास विजेचा इतका वापर करतो की, आपलं विजेचं बिल हजारोंच्या घरात पोहोचतं. मग अनेकजण चूकीची शक्कल लढवतात आणि विजेची चोरी करतात.
मग काय, चोरीची वीज वापरल्यामुळे अडकतात आणि लाखोंचा दंड भरतात. त्यापेक्षा प्रामाणिकपणे हजारोंचं बिल भरणं कधीही चांगलं.बिहारच्या जमुई जिल्ह्यातून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. चोरून वीज वापरणाऱ्या एका व्यक्तीला विद्युत विभागाने तब्बल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. जमुई जिल्ह्याच्या खैरा पोलीस स्थानक क्षेत्रातून विद्युत विभागाच्या धाडीत समोर आलेल्या या प्रकरणाची तक्रार पोलिसांतही दाखल झाली आहे.स्वस्तात मस्त ज्वेलरीची ‘इथं’ करा खरेदीमिळालेल्या माहितीनुसार, जोगाझिंगोई गावात विद्युत विभागाकडून छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत प्रकाश साव नामक व्यक्तीच्या घरात अवैध पद्धतीने वीजपुरवठा सुरू असल्याचं आढळलं.
त्याने विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून घरात वीजपुरवठा घेतला होता. मीटरची तार कापून तिथे दोन कनेक्शन जोडले होते. एका कनेक्शनद्वारे त्याच्या घरात वीजपुरवठा सुरू होता, तर दुसरं कनेक्शन मोटरला जोडलं होतं.घरात सतत कटकटी होतात?
‘हा’ उपाय करताच होईल टेन्शन दूरहे प्रकरण समोर येताच विद्युत विभागाने कडक कारवाई केली. प्रकाश साव 5 हॉर्स पॉव्हरची मोटार चोरीच्या विजेने चालवत होता. ज्यामुळे विद्युत विभागाचं 1 लाख 9 हजार 497 रुपयांचं नुकसान झालं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याविरोधात प्रकाश सावला 1 लाख 22 हजार 896 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच कारवाईत काही सामान जप्त करण्यात आल्याचंही कळतं आहे.