
जळगाव मिरर | १५ मे २०२५
शहरातील मेहरूण परीसरातील रामेश्वर कॉलनी येथील गट नं. २५०/१+२/ओपन स्पेस (नगरपालीका, जळगाव) येथे नागरीकांकरीता जॉगींग ट्रॅक, बगीचा, ओपन जीम, अभ्यासिका, लहान मुलांचे खेळणे सुविधा आमदार फंडातुन उपलब्ध करून मिळावी. या आशयाचे निवेदन आ.भोळे यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, जळगाव छत्रपती संभाजी नगर हायवे लगतच्या मेहरूण परीसरातील रामेश्वर कॉलनी, महादेव मंदीर परीसर, मेहरूण गावठाण लगतच्या परीसरात जवळपास कुठेही नागरीकांकरीता जॉगींग ट्रॅक, ओपन जीम, अभ्यासिका तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा व खेळणे नाही.
या सगळ्यांचा विचार करता आम्ही रामेश्वर कॉलनी व परीसरातील सर्व नागरीक आपणांस मागणी करतात की, मौजे मेहरूण गट क्र. २५०/१+२/ओपन स्पेस (नगरपालीका जळगांव) येथे आम्ही वृक्षवाटीका लोकसहभागातुन तयार केलेली आहे. आपल्या आमदार फंडातुन वरील प्रमाणे जॉगींग ट्रॅक, बगीचा, ओपन जीम, अभ्यासिका, लहान मुलांचे खेळणे वगैरे सुविधा आपण दिल्यास आम्ही आपले आभारी राहु.असे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना रामेश्वर कॉलनी व परीसरातील नागरीक मिराबाई पडळकर, कल्पना ढाकणे, रोहिणी ताई कुलकर्णी, सिंधुबाई मांडोळे, विजया मांडोळे, हर्षल वाणी, संदीप मांडोळे गणेश पाटील अविनाश पाटील डि आर पाटील अशोक कोष्टी इत्यादी उपस्थित होते




















