जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२५
मालदाभाडी हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात जामनेरच्या वनपाल अधिकारी ज्योती धनगर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देत मार्गदर्शन केले.
न्यू इंग्लिश स्कूल मालदाभाडी शाळेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत योजने अंतर्गत वृक्षलागवड करण्यात आली. सामाजिक वनीकरण विभाग जामनेर व ग्रीन आर्मी च्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला एक विद्यार्थी एक झाड देवून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी १०० वृक्षांचे वाटप मालदाभाड़ी शाळेत करण्यात आले.
ग्लोबल वार्मींग वर मात करण्यासाठी विविध शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातुन वृक्ष वाटप व वृक्षारोपण करण्याचे कार्य सुरू आहे असे वनविभागाच्या वनपाल ज्योती धनगर मॅडम यांनी माहिती देऊन पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. शिकोकार हे होते. तर प्रमुख अतिथी जामनेर क्षेत्र वनपाल ज्योती धनगर, वनरक्षक मारोती गाडेकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीन आर्मीप्रमुख विजय सैतवाल यांनी केले. तर आभार सौ. करुणा महाजन यांनी मानले सुत्रसंचलन आर. एल. कोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी ए. बी. पाटील, जी. टी. पाटील, एन. एस. पाटील, एन. जी. पाटील, मनोज जैन, समृद्धी बोरसे, सृष्टी नेवल, खुशी पाटील, श्रेया कापसे, दिपीका सोनार, रोशन वंजारी, समर्थ परखड, रोहन पारधी, ओम गावंडे व ग्रीन आर्मी स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले.