
जळगाव मिरर । १४ डिसेंबर २०२२
जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे दि १३ रोजी मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास गावातीलच एकाने माजी सरपंचाच्या दिशेने बंदुकीतून हवेत गोळीबार केला व तुला शूट करुन टाकतो, मग पहा तुझ्या पॅनलचे काय होते अशी धमकी दिली. संशयिताला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नागरीकांनी जामनेर पोलीस ठाणे आवारात ठिय्या केले.
हिंगणे बुद्रुक येथील माजी सरपंच अनिल चौधरी हे गावात असताना ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडीत गोसावी याने त्यांचे छातीला बंदूक लावून धमकी दिली. त्याच्यासोबत असलेला तुषार संजय गोसावी याने कॉलर पकडून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी नागरीक जमा झाल्याने दोघांनी पळ काढला. चौधरी यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर गोसावी व तुषार गोसावी यांचे विरुध्द भादंवि कलम ३०७, ३२३ शस्त्र कायदा ३/२५, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिपक मोहीते तपास करीत आहे.




















