
जळगाव मिरर | ६ जून २०२५
मृत अर्भकाच्या जन्माची माहिती लपविण्यासाठी सुमारे तीन ते चार महिन्याचे अर्भक सार्वजनिक ठिकाणी फेकून दिले. ही घटना दि. ३ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील कांचननगर परिसरातील कालिंकामाता मंदिर परिसरात घडी. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कांचन नगरातील कालिंका माता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत दि. ३ रोजी दुपारच्या सुमारा तीन ते चार महिन्याचे अर्भक मिळून आले. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ते अर्भक ताब्यात घेत तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. दरम्यान, अज्ञात महिलेने त्या मृत अर्भकाचया जन्माची माहिती लपविण्याच्या उद्देशाने या अर्भकाची गुप्तपणे विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने ते फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रमोद पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील हे करीत आहे.




















