जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२५
सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या अर्चना पाटील हीच्याकडे मालमत्ता नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. मात्र असे असले तरी तिच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता, त्यावेळी तिच्या घरामध्ये महागडी घड्याळ, चपला बूट यासह अनेक वस्तू होत्या. पोलिसांनी इतक्या महागड्या वस्तू पाहून चक्रावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत महिला पोलीस कर्मचारी अर्चना पाटील हिने पोलीसांसह सर्वसान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात वेगवेगळ्या मुद्यांनुसार तपास केला जात आहे.
हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अर्चना पाटीलसह तिच्या कुटुंबातील सदस्यांची बँक खात्याची माहिती काढली. यामध्ये तिच्याकडे मालमत्ता, बँक खात्यात मोठे व्यवहार झाले नसल्याचे तपासात समोर येत आहे. परंतु पोलिसांनी अर्चना पाटील हीच्या घराची झाडाझडती घेतली, मात्र तिच्या घरात महागडी घड्याळ, महागडे चपला व बूटांसह अन्य बॅण्डेड वस्तू असल्याचे पोलिसांना दिसून आले. अटकेतील अर्चना पाटील हिच्या वाढीव पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने सोमवार दि. १७ फेब्रुवारी तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे