
जळगाव मिरर | १९ मार्च २०२६
सोशल मीडियावर वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर Meta कंपनीने क्रिएटर्ससाठी मोठा निर्णय घेतला आहे. ‘Creator Fast Track’ या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून क्रिएटर्सना केवळ प्रसिद्धीच नाही, तर थेट उत्पन्नाची संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या उपक्रमाचा उद्देश इतर प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय क्रिएटर्सना Facebook कडे आकर्षित करणे हा आहे. यासाठी Meta क्रिएटर्सना आर्थिक प्रोत्साहनासोबतच त्यांच्या कंटेंटला अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी अल्गोरिदमिक सपोर्ट देणार आहे. त्यामुळे नवीन प्लॅटफॉर्मवर सुरुवात करताना येणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.
या योजनेअंतर्गत निवडक क्रिएटर्सना तीन महिन्यांसाठी निश्चित उत्पन्न दिले जाणार आहे. Instagram, YouTube किंवा TikTok यांसारख्या प्लॅटफॉर्मवर किमान 1 लाख फॉलोअर्स असलेल्या क्रिएटर्सना दरमहा सुमारे 80 हजार रुपये मिळू शकतात. तर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या क्रिएटर्सना दरमहा तब्बल 2.8 लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय, पात्र क्रिएटर्सच्या फेसबुक Reels ला अधिक रिच दिला जाणार असून, त्यांच्या फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. हा अल्गोरिदमिक बूस्ट क्रिएटर्सना फेसबुकवर लवकर स्थिर होण्यासाठी मदत करणार आहे. या उपक्रमातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, सहभागी क्रिएटर्सना फेसबुकच्या कंटेंट मॉनेटायझेशन टूल्सचा वापर करता येणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांनंतरही ते आपल्या कंटेंटमधून नियमित कमाई करू शकतील.
दरम्यान, Meta च्या व्यापक धोरणाचा हा एक भाग असून 2025 मध्ये कंपनीने क्रिएटर्सना सुमारे 3 अब्ज डॉलरचे पेमेंट केल्याचा दावा केला आहे. यामध्ये शॉर्ट व्हिडिओंचा मोठा वाटा असून सुमारे 60 टक्के उत्पन्न Reelsमधून येत असल्याचे सांगितले जाते.
क्रिएटर्ससाठी “Qualified Views”, “Earnings Rate” आणि “Non-Qualified Views” यांसारखे नवे मेट्रिक्सही सादर करण्यात येणार आहेत. यामुळे कंटेंटचे परफॉर्मन्स समजून घेणे आणि उत्पन्न वाढवणे अधिक सोपे होणार आहे.
सध्या हा कार्यक्रम ‘invite-only’ स्वरूपात असून निवडक क्रिएटर्सनाच त्यात सहभागी होता येणार आहे. मात्र इच्छुक क्रिएटर्स Facebook च्या Professional Dashboard वरून नोंदणी करू शकतात.
एकूणच, ‘Creator Fast Track’ हा उपक्रम क्रिएटर्ससाठी मोठी संधी ठरत असून, वाढत्या स्पर्धेत Meta आता आक्रमक धोरण राबवत असल्याचे स्पष्ट होत आहे.





















