जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२५
चोपडा शहरात मध्यरात्री शिरपूर बायपास रोडवर लुटीची तयारी करणाऱ्या सात धोकादायक आरोपींना चोपडा शहर पोलिसांनी धाडसी कारवाईत जेरबंद केले. या आरोपींकडून दोन गावठी पिस्तुलं, तलवारी, मॅगझीन, मोबाईल फोन आणि चारचाकी वाहन असा सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर यापूर्वी खून, दरोडा, खंडणीवसुली आणि दहशत माजवण्याचे गंभीर गुन्हे नोंद असून, ही कारवाई चोपडा पोलिसांच्या दक्षतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
चोपडा शहरामध्ये शिरपुर बायपास रोडवर एका पांढ-या रंगाच्या गाडीमध्येसंशयीत इसम बराच वेळ थांबलेले असल्याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना दिनांक २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ०२-३० वा चे सुमारास गोपनीय बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने तात्काळ पोलीस पथक तयार करून संशयीत गाडीचा शोध घेतला असता रणगाडा चौकाच्या थोडे पुढे, शिरपुर बायपास रोडच्या बाजुला पांढऱ्या रंगाचीस्विप्ट डिझ गायरचारचाकीकारक्र.MH २६ CH १७३३ ही थांबलेली, सदर गाडीच्या बाहेर दोघेजण लक्ष ठेवुन उभे असलेले व पाच जण आतमध्ये बसलेले असे एकुण सात संशयीत इसम मिळुन आले. पोलीसांना पाहुनत्यांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस पथकानेतात्काळ घेराव घालुनसदरच्या सातही इसमांना पकडले. सदर इसमांचीतसेच त्यांच्या मो. कारची इ ाडती घेतली असता दोन इसमांच्या कंबरेला लोडकरण्यात आलेले गावठी कट्टे मिळुन आले. त्याचप्रमाणेगाडीमध्ये दोन तलवारी तसेच एक रिकामे मॅगझीन मिळुन आली. सदर इसमांची नावे पुढिलप्रमाणे आहेत.
१. दिलीपसिंघ हरीसिंध पवार वय ३२ वर्ष रा. प्लाट नं. ४२१ नाथनगर, नांदेड ता.जि. नांदेड, २. विक्रम बाळासाहेब बोरगे वय २४ वर्षे रा. येवलारोड, विरभद्र मंदीरा जवळ वैजापुर ता. वैजापुर जि. संभाजीनगर ३. अनिकेत बालाजी सुर्यवशी वय २५ वर्षे रा. नवामोंढा, गणेश मंदीर जवळ नांदेड ता.जि. नांदेड. ४. अमनदिपसिंघ अवतारसिंग राठोड वय २५ वर्षे रा. मगनपुरा नांदेड ता.जि. नांदेड. ५. सद्दामहुसेन मोहंम्मद अमीन वय ३३ वर्षे रा. इतवारा मेस्को रोड, नांदेड ता.जि. नांदेड, ६. अक्षय रविंद्र महाले वय ३० वर्षे रा. भावसार गल्ली चोपडा ता. चोपडा जि. जळगाव, ७. जयेश राजेंद्र महाजन वय ३० वर्ष रा. भाटगल्ली चोपडा ता. चोपडा जि. जळगाव
सदर संशयीतांबाबत अधिक चौकशीकेली असता ते नामचीन गुन्हेगार असल्याचे व त्यांच्यावर यापूर्वी पुढिलप्रमाणेबुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, दहशत माजवणे, अग्निशस्त्रे व तलवार, चॉपर बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे नांदेड, वैजापुर जि संभाजीनगर, तसेच चोपडा येथे यापूर्वी दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरचे गुन्हेगार अतिशय धोकादायक असुनत्यापैकी दोन आरोपीहे महाराष्ट्र धोकादायककृत्यांना प्रतिबंध अधिनियम (MPDA) कायद्यान्वयेच्या स्थानबध्दतेमधुन नुकतेचकारागृहातुन बाहेर आलेले आहेत. एक आरोपी वैजापुर, जि संभाजीनगर येथील दरोडा व आर्म अॅक्टच्या गुन्हयामध्ये फरार असलेला आहे. चोपडा येथील एका आरोपीवर पुर्वी अग्निशस्त्र बाळगल्याबाबत तसेच दंगल केल्याबाबत गुन्हे नोंद आहेत. सदरचे सर्व ०७ आरोपीहेसंगनमताने रस्तालुट व दरोड्याचीतयारीकरून सशस्त्र स्थितीत एकत्र जमल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेविरूध्द चोपडा शहर पोलीसस्टेशनगु.र.न ५८१/२०२५भा.न्या.सं. कलम ३१० (४),३१०(५), सह शस्त्र अधिनियम १९५९ चेकलम ३/२५, ४/२५ सह महा. पोलीसकायदाकलम ३७ (१) (३) चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे नोंदकरण्यात आला असुन आरोपींना अटककरण्यात आले आहे व त्यांच्याकडे मिळुन आलेले गावठी पिस्टल, तलवारी, मोबाईल फोन, रोख रक्कम, चारचाकीगाडी असा एकुण १३,१०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीतांना रिमांडकामी न्यायालयात हजरकरण्यात येत आहे. आरोपीतांबाबत केलेल्या तपासामध्ये दिसुन आले आहेकी, नांदेड येथेसदर आरोपीतांची अतिशय दहशत असुन लोकांना शस्त्रांचा धाक दाखवुन खंडणी वसुल करणे, खंडणीसाठी अपहरणकरणे, विवस्त्र करून लोकांचा छळकरणे व त्याचे व्हिडीओ तयारकरूनते इतर लोकांना दाखवुन त्यांना घाबरवणे असेकृत्येकरत असल्याचे दिसुन येत आहे. त्याबाबत सखोल तपास चालु आहे.
यांनी केली कारवाई यशस्वी !
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा श्री अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोहेकॉ/२८९६ हर्षल पाटील, पोहेकॉ/२०८६ संतोष पारधी, पोहेकॉ/१८०५ ज्ञानेश्वर जवागे, पोकों/२१५८ अजिंक्य माळी, पोकॉ/५०३ अमोल पवार, पोकॉ/३२३८ मदन पावरा, पोकॉ/७६८ रविंद्र मेढे, पोकों/२१४५ विनोद पाटील, चालक पोहेकॉ/२०१० किरण धनगर, पोकों २१२५ योगेश पाटील, पोकॉ/१४४१ प्रकाशठाकरे यांनी पार पाडली असुन गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करत आहेत.

 
			

















