जळगाव मिरर | १२ मे २०२४
जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या नावाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी एक खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूज चॅनलचा लोगो व नाव वापरून एक फेक पोस्ट तयार करण्यात आली. त्यात स्मिताताईंना फोटो व नाव देखील वापरुन खोडसाळपणा करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब निदर्शसनास येताच स्मिताताईंनी तीव्र नाराजी केली. मंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला.
स्मिताताई म्हणाल्या की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जीवनात पाळणारे आहोत. शिवछत्रपतींच्या काळात महिलांना सन्मान मिळत होता. मात्र आता काही विरोधक महिलांच्या नावाने असे प्रकार करुन महिलांचा अपमान करत आहेत. मराठ समाजाबद्दल अशी आक्षेपार्ह करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र माझ्या विरोधात षडयंत्र रचून बदनामी करण्याचा प्रयत्न करणारच्यां विरोधात आम्ह कायदेशीर कारवाई करणार आहोतच, असे स्मिताताः यांनी स्पष्ट केले. गिरीश महाजन म्हणाले की, विरोधकांच्या पायाखालच वाळू सरकली आहे. त्यांना त्यांचा पराभव समोर दिस् लागला आहे. यामुळे समाजांमध्ये तेढ निर्माण करुन् स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. मात्र त्यांना सुज्ञ मतदार त्यांना त्यांची जाग दाखविल्याशिवाय राहणार नाही. असे ना. गिरीश महाजन यांनी सांगितले.