जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२४
वेफर्स फॅक्टरीसाठी घेतलेल्या कर्जाच्या मोबदल्यात काढलेल्या विमा कंपनीकडून पैसे परत मिळावे. यासाठी फॅक्टरीच्या मालकानेच चोरीचा बनाव करत पोलिसात तक्रार दिली. अवघ्या दोन दिवसात पोलिसांनी तपास चक्र फिरवत चोरीचा छडा लावित चोरीचा बनाव करणारा मालकच या गुन्ह्यातील मास्टरमाईंट निघाला. पोलिसांनी त्याच्यासह मशिन चोरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील निंबोल येथील रहिवाशी निरज सुनील पाटील यांनी नांदोरखेडा शिवारामध्ये वेफर्स बनवण्याची फॅक्टरी आहे. त्यासाठी त्यांनी बँकेकडून पाच लाखाचे कर्ज घेवून फॅक्टरीचा इन्शुरन्स काढलेला होता. त्यांना ३५ टक्के सबसिटी देखील मिळाली होती, परंतु उर्वरित रक्कम कशी फेडता येईल यासाठी फिर्यादीने आपल्याच फॅक्टरी चोरीचा बनाव करावा अशी योजना आखली. सोबतीला उमेश शांताराम सुतार (वय २४, रा. डॉ. बाबासाहेब आंडेकर चौक), कौशल जितेंद्र जंजाळकर (वय १९, रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) यांनी फॅक्टरीत चोरी केली. त्यानंतर दि. ३ एप्रिल रोजी निरज पाटील हे पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले.
नांदुरखेडा शिवारातील श्रीकृष्ण केला वेफर्स फॅक्टरी मध्ये प्रवेश करुन चोरुन नेली. तसेच गावातील लक्ष्मीबाई विश्वनाथ पाटील माध्यमीक विद्यालयाचे मागील बाजुला असलेले कॅमेऱ्यांची तोडफोड करुन नुकसान केले. पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास करीत असतांना त्यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता, त्यांचे लोकेशन त्याठिकाणावरील मिळून आल्यानंतर गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत निरज पाटील हाच चोरीतील मास्टरमाईंड असल्याचे समोर आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहा. पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोउनि घनश्याम तांबे, पोकॉ. विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, सचिन घुगे, राहुल परदेशी, अमोल जाधव, विकार शेख, सुकेश तडवी, समाधान ठाकुर यांच्या पथकाने केली